जळगाव । मूळजी जेठा महाविदयालयातील इंग्रजी विभाग, नॉर्थ महाराष्ट्र युनिर्व्हसिटी इंग्लिश टिचरर्स असोसिएशन आणि ऑल इंडिया नेटवर्क ऑफ इंग्लिश टिचरर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रिजनल इंग्लिश लँग्वेज ऑफिस यु.एस.अॅम्बसी इंडिया (रेलो) व ब्रिटीश कौसिंल, इंडिया यांच्या सहकार्याने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयातील जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये दि.6 व 7 जानेवारी 2017 रोजी भाषा, साहित्य आणि संस्कृती: नवे प्रवाह या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. परिषदेचे उद्घाटन दि.6 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता होणार आहे. यात कोलंबिया (अमेरिका), मँचेस्टर (युनायटेड किंगडम), बु्रनेई, सिंगापूर या देशासह करनाल (हरियाना), हैद्राबाद येथील प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत दोन व्याख्यान सत्रासह गटचर्चा आणि कार्यशाळा होणार आहे. यात इंग्रजी भाषा, साहित्य व संस्कृती या अनुषंगाने स्थान व ओळख, माध्यमे, राजकारण, तंत्रज्ञान, आदर्शवाद, संभाषण, साहित्य निर्मिती व प्रसार यासह 21 व्या शतकातील इंग्रजी भाषा व साहित्याचे अध्यापन आदी विषयावर चर्चा घडून येणार आहे. परिषदेत सहभागी होवू इच्छिणााया शिक्षक, संशोधक व अभ्यासकांनी नाव नोदंणीसाठी इंग्रजी विभागाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला किंवा विभागप्रमुख डॉ.भूपेंन्द्र केसुर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.