मु.जे.महाविद्यालयाच्या हिवाळी शिबीरातून कॅशलेस संबंधी जनजागृती

0

जळगाव :  मू.जे.महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष हिवाळी शिबीर जळगाव तालुक्यातील रायपूर येथे 25 ते 31 डिसेंबर दरम्यान संपन्न झाले. शिबीरात सहभागी विद्यार्थ्यानी लेसकॅश टू कॅशलेस या विषयावर रॅली काढून जनजागृती केली. तसेच शिबीरात विद्यार्थ्यानी स्वच्छ भारत, वृक्षारोपन, बेटी बचाओ बेटी पढाओ, रस्ता सुरक्षा व सुरक्षित वाहतूक, पर्यावरण संवर्धन याविषयी गावात प्रभातफेरी काढत मोहिमेचा संदेश दिला. शिबीरा दरम्यान बौध्दीक सत्रात विद्यार्थ्याना लेसकॅश टू कॅशलेस, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, अवयवदान, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

31 डिसेंबर रोजी शिबीराचा समारोप झाला. समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रायपूर येथील सरपंच ताराबाई परदेशी उपस्थित होत्या. समारोप प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनोचे कार्यक्रम अधिकारी डॉ.कुणाल इंगळे यांनी शिबीरात झालेल्या उपक्रमाचा आढावा घेतला. सूत्रसंचालन निखील पाटील यांनी तर आभार पियुष तोडकर यांनी मानले.शिबीरासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.योगेश महाले, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. संगिता चंद्रात्रे, यांनी परिश्रम घेतले.