जळगाव : मूळजी जेठा महाविद्यालयातील इंग्रजी विभाग, नॉर्थ महाराष्ट्र युनिर्व्हसिटी इंग्लिश टिचरर्स असोसिएशन आणि ऑल इंडिया नेटवर्क ऑफ इंग्लिश टिचरर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रिजनल इंग्लिश लँग्वेज ऑफिस यु.एस.अॅम्बसी इंडिया (रेलो) व ब्रिटीश कौसिंल, इंडिया यांच्या सहकार्याने भाषा, साहित्य आणि संस्कृती: नवे प्रवाह या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 6 व 7 जानेवारी रोजी महाविद्यालयातील जुना कॉन्फरन्स हॉलमध्ये परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डीन, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी, ब्रुनेई येथील डॉ. अनिल पाठक यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अध्यक्ष स्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश बी. पाटील तर तर प्रमुख अतिथी म्हणून ब्रिटीश कौन्सिल चे प्रतिनिधी जॉन पार्न्हम, मँचेस्टर (युनायटेड किंगडम), उपस्थित राहतील. यावेळी बीज भाषण रेलो चे प्रतिनिधी रचेल डैमंद यांचे होणार आहे. दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेस कोलंबीया,सिंगापूर, हैद्राबाद येथील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 7 रोजी माहुलीकर यांचे उपस्थितीत समारोप होणार आहे.