सोहम नॉलेज सेंटरमध्ये डॉ.मयूर जैन यांनी केले मार्गदर्शन
जळगाव – अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी वर्ष व केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या वाटचालीचे औचित्य साधून के.सी.ई. सोसायटी संचालित मदर टेरेसा हेल्थ केअर सेंटर व इंडीयन डेंटल असोसिएशन जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मु.जे. महाविद्यालयातील सोहम नॉलेज सेंटर येथे ४ फेब्रुवारी २०१९ रोजी विद्यार्थ्यांसाठी जागतिक कॅन्सर दिनानिमित्त कॅन्सर आजार विषयी दंतरोग तज्ञ डॉ. मयूर जैन यांनी मार्गदर्शन करत पीपीटीद्वारे उपायायोजना सांगितले. यात विद्यार्थ्यांनी तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम व त्यावरील नियंत्रणाचे उपाय याविषयी जाणून घेतले.
या कार्यक्रमाप्रसंगी मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.डी. कुलकर्णी, इंडीयन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ललित चौधरी, दंतरोग तज्ञ डॉ.अंशिमा जैन, बॅवाईज होस्टेलचे रेक्टर प्रा. विजय लोहार, नॅचरोपॅथी समंवयक प्रा.अनंत महाजन हे उपस्थित होते. तसेच यावेळी योग विभाग प्रमुख प्रा. आरती गोरे यांनी योगाविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.यु.डी. कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदर टेरेसा हेल्थ केअर सेंटरच्या मेडीकल ऑफीसर डॉ. लीना चौधरी यांनी केले तर सुत्रसंचालन अश्विन सुरवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुकेश पाटील व सागर गुरव यांनी परिश्रम घेतले.