हडपसर । रयत शिक्षण संस्थेच्या एस.एम. जोशी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने हडपसर येथील कर्णबधिर व मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. अरविंद बुरुंगले म्हणाले, समाजामध्ये अनेक उपेक्षित घटक असतात. त्यांना इतर समाजाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. शारीरिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना समजून घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होते, असे सांगून त्यांनी कर्णबधिर व मूकबधिर विद्यालयास मदत व सहकार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापक मुग्धा जगताप, उपप्राचार्य डॉ. अशोक धुमाळ, उपमुख्याध्यापिका उमा तारू, संजीवनी बागडे, डॉ. प्रभंजन चव्हाण, प्रा. बाळासाहेब देवकाते, डॉ. हेमलता कारकर, डॉ. वैशाली पाटील, डॉ. एस. डी. मिसाळ, डॉ. एस. डी. लांडे, प्रा. नम्रता मेस्त्री, प्रा. एन. एस. काळेल आदी उपस्थित होते.