येळसे । पवना नदी प्रदूषित होऊ नये यासाठी मावळातील येळसे येथे मूर्तीदान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमात येळसेचे सरपंच शिवाजी सुतार, उपसरपंच नवनाथ ठाकर, नितीन ठाकर, बाळू ठाकर, मुकुंद ठाकर, अमित ठाकर, कुंदन ठाकर, सुरज ठाकर, प्रमोद ठाकर, अर्जुन घोडके, मंगेश सुतार, तानाजी आडकर यांनी मूर्तीदान केली.
पवना बंद जलवाहिनी विरोधी आंदोलनाप्रसंगी मावळ येथे झालेल्या गोळीबारात मृत पावलेल्या कांताबाई ठाकर यांचा मुलगा नितीन ठाकर यांनी हा उपक्रम राबविला. पवना नदी प्रदूषित होऊ नये यासाठी मूर्तीदान करण्याचे त्यांनी युवकांमध्ये रुजवले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. येथे 11 मूर्ती दान करण्यात आल्या. तर पुढील वर्षी शाडूच्या मातीच्या गणपती बसवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तर निर्माल्य देखील नदीमध्ये सोडले नाही. याकामी कांताबाई ठाकर प्रतिष्ठान व अॅड. भरत ठाकर प्रतिष्ठानने पुढाकार घेतला.