मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण

0

पिंपरी-चिंचवड । पर्यावरण संवर्धन समितीतर्फे पिंपळे निलख येथील महापालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती बनविण्याचे प्रशिक्षण मूर्तीकार दीपक कुंभार यांच्याकडून देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक तुषार कामठे, आरती चोंधे, ममता गायकवाड, संदीप कस्पटे, सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व दैनिक ‘जनशक्ति’चे मुख्य संपादक कुंदन ढाके, रवींद्र दुधेकर, पर्यावरणतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पवार आदी उपस्थित राहणार आहेत. सामाजिक उत्तरदायित्व आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यातील खरा आनंद मिळविण्यासाठी जास्तीत जास्त मातीच्या अथवा पर्यावरणपूरक साहित्यापासून मूर्ती बनविण्याचे कौशल्य अंगी यावे, यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पिंपळे निलख येथील महापालिकेच्या शाळेत जरी हे प्रशिक्षण होत असले तरी ते इतर शाळेतील विद्यार्थी व परिसरातील नागरिकांसाठीदेखील विनामूल्य उपलब्ध आहे, असे विकास पाटील यांनी सांगितले.