मूळजी जेठा महाविद्यालयातील सॉफ्टबॉल, योगा खेळाडुंचा गौरव

0

जळगाव । केसीई सोसायटी संचलीत मू.जे.वरिष्ठ महाविद्यालयात 21 मार्च रोजी जिमखाना डे चे आयोजन करण्यात आले. यात सॉफ्टबॉल खेळाडु सुमेध तळवेलकर व योगा खेळाडू जासमीन गाजरे यांचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला. तायक्वांदो खेळाडू विशाखा सपकाळे याला उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरविण्यात आला. तसेच वर्षभरात खेळात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यात निलेश पाटील, श्रृती जगताप, शुभम भोंगळे, महेश गवळी आदींना समावेश आहे. मू.जे.महाविद्यालयाच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात निवड झालेल्या 38 खेळाडूंना प्रत्येकी एक हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त खेळाडूंचा दिड हजार रुपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील, मू.जे.महाविद्यालय प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, मिलींद दर्पइंदौर, प्रा. तारकदास, डॉ.दिनेश पाटील आदी उपस्थित होते.