मू.जे. महाविद्यालयात योग दिनानिमित्त प्रबोधन

0

जळगाव । मू.जे.महाविद्यालयाच्या सोहम योग विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाबद्दल जनजागृती व्हावी, यासाठी 24 मे ते 21 जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 21 जून हा दिवस संपूर्ण जगात योग दिवस म्हणून साजरा केला जातो. स्पर्धेच्या युगात नागरिकांकडून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये योगाबद्दल जनजागृती व्हावी, या उद्देशाने महिनाभर विविध उपक्रम योग विभागाकडून राबवले जाणार आहेत. शिवाजीनगरातील वितराग भवन, गणपतीनगरातील गुरुनानक सभागृह मू.जे.महाविद्यालयाच्या योग सभागृहात सकाळी ते वाजेदरम्यान मोफत योग शिबिर घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्येही योगाबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध वयोगटानुसार वक्तृत्व, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 21 जूनपर्यंत प्रत्येक शनिवारी मू.जे. महाविद्यालयाच्या योग विभागात योग अध्यात्मावर आधारित माहितीपट दाखविण्यात येणार आहे. 21 रोजी रक्तदान शिबिर, संपूर्ण दिवसभर मार्गदर्शन कार्यक्रम राबवले जाणार आहे.