मू.जे.ला माहिती अधिकारात माहिती देण्याचे आदेश

0

जळगाव: माहिती अधिकारी अधिनियम 2005 अन्वये नागरिकांना माहिती मागविता येते. कायद्यान्वये माहिती मागण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. मात्र मू. जे. महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाने विनाअनुदानित तत्वावर विभाग सुरु असल्याचे कारण दाखवून माहिती अधिकारात माहिती देण्याचे नाकारले. डॉ.संजय भोकरडोळे यांनी 5 जानेवारी 2015 रोजी महाविद्यालयाताने पत्रकारिता विभागात केलेल्या प्राध्यापक भरतीच्या अनुषंगाने माहिती मागितली होती. मात्र जनमाहिती अधिकारी यांनी विनाअनुदानित तत्वाचे कारण दाखवत भोकरडोळे यांना माहिती देण्यास नकार दिला.

डॉ. संजय भोकरडोळे यांची माहिती
भोकरडोळे यांनी राज्य माहिती आयुक्त नाशिक यांच्याकडे अपिल अर्ज दाखल केला असता विनाअनुदानित तत्वाचे कारण माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास अडसर ठरु शकत नाही असे जाहीर करुन अपीलार्थीस 15 दिवसाच्या आत मागितलेली माहिती देण्याचे आदेश दिले आहे. आदेशाची प्रत जनमाहिती अधिकारी तथा प्र.कुलसचिव मू.जे.महाविद्यालय, प्रथम अपिलीय अधिकारी प्राचार्य यांना देण्यात आली आहे. खान्देशात पत्रकारितेचे अभ्यासक्रम विद्यावर्धीनी महाविद्यालय धुळे, मू.जे.महाविद्यालय आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या तीन ठिकाणी सुरु आहे. मू.जे.महाविद्यालयातील पत्रकारिता विभाग हे कायम विनाअनुदानित तत्वावर सुरु आहे.