मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

0

जळगाव – शहरातील जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात २८ ऑगस्ट रोजी अनोळखी इसम उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. दरम्यान उपचारा दरम्यान त्या इसमाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या इसमाची ओळख पटली असता. त्याच्या कुटूंबियांना माहिती देण्यात आली. मात्र कुटूंबियांकडून मृतदेह घेवून जाण्यास नकार देण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीस आला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भास्कर फकीरा पाटील रा. बजरंगपुरा जामनेर हा इसम अनोळखी म्हणून जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत होता. आज उपचारा दरम्यान या इसमाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सर्वत्र तपास केला असता. या युवकाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकुटूंबियांना माहिती दिली. नातेवाईक ओखळ पटविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आले. मात्र नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आहे. पुढील विश्राम पाटील करीत आहे.