मृत्यूचे संकेत देणारे रेणू

0

जन्म आणि मृत्यू कधी होईल हे काही सांगता येत नाही. मात्र, अनेकांना आपले आयुष्य किती शिल्लक राहिले आहे हे जाणून घेण्याची इच्छा असते. आता तसे भाकीत करु शकणारी एक रक्ताची चाचणी विकसित करण्यात आली आहे. या रक्तचाचणीने अगदी धट्टाकट्टा माणूसही न्युमोनिया किंवा सेप्सिसने आगामी चौदा वर्षांत केव्हा मृत्यू पावेल याचा अंदाज करता येतो, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. ‘ग्लिक-ए’ नावाचे शरीरातील रेणू याबाबतचे भाकीत करु शकतात. त्यांच्या मते ‘ग्लिक-ए’ रेणूंचे रक्तातील प्रमाण जर जास्त असेल तर शरीरात हे संसर्ग वाढतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात दाह होऊन मृत्यू येतो. किमान 10 हजार व्यक्तींवर संशोधकांनी प्रयोग करुन अशा संसर्गामुळे मृत्यू केव्हा होईल हे सांगणारा ‘ग्लिक-ए’ रेणू शोधला आहे.

त्याने अकाली मृत्यूही कळू शकतो. ‘ग्लिक-ए’ चे प्रमाण रक्तात जास्त झाले तर प्रतिकारशक्ती प्रणालीकडून अतिप्रतिसाद दिला जातो, त्यामुळे वेदना होऊन शरीराचे नुकसान होते. त्यात शरीरात जंतुसंसर्गही बराच होतो. यात सेप्सिस म्हणजे शरीरात जंतुसंसर्ग होऊन पू होतो. वैद्यजैवक संशोधकांनी चांगली पृकृत असलेल्या लोकांतही या रोगांचा संसर्ग आणि अकाली मृत्यूचे अनुमान करता यावे यासाठी हे संशोधन केले आहे, इनोये आणि सहकार्‍यांच्या मते ‘ग्लिक-ए’चा संबध या रोगांशी कसा असतो हे दाखवण्यासाठी आणखी संशोधकानची गरज आहे. ओलू विद्यापीठाचे जोहान्स केटूनेन यांच्या मते या रोगांमुळे असलेला धोका आधीच ओळखता येतो आणि त्यासाठी ‘ग्लिक-ए’ या जैवदर्शक रेणूची चाचणी करावी लागते आणि इतर चाचण्या आपण करतो तशी ही रक्ताची चाचणी उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे कलांतराने या रोगांमुळे असलेला जीवघेणा धोका आधीच कळतो आणि योग्य काळजी घेता येते.