आलाबामा – नन्सच्या हत्येबद्दल मृत्युंदंड झालेल्या कैद्याने शेवटच्या जेवणात बायबल खाल्ल्यामुळे सर्वच विस्मयचकीत झाले आहेत. त्याच्या या कृत्याला तुरूंग प्रशासनाने मात्र शेवटच्या जेवणाच्या धोरणानुसार विरोध केला नाही.
३३ वर्षाच्या जर्मी मॉरिस याला तुरूंगअधिकाऱ्यांनी शेवटच्या जेवणाबाबत विचारल्यानंतर त्याने मला फक्त बायबल पाहिजे असे उत्तर दिले. त्यांना वाटले की याला उपरती झाली आहे म्हणून बायबल वाचायचे असणार. किंग जेम्स बायबल ही प्रत लगेचच मॉरिसला देण्यात आली. त्याने वाचन न करता १२०० पानांच्या बायबलचे छोटे तुकडे केले आणि खायला सुरूवात केली. अगदी कव्हरही त्याने सोडले नाही. यासाठी त्याला अनेक तास चर्वण करावे लागले. तुरूंगातील अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला नाही. कारण तुरूंगाच्या शेवटच्या भोजनाबाबत असलेल्या धोरणाला विसंगत असे काहीही हा कैदी करीत नव्हता. मॉरिसने २००७ मध्ये दोन ख्रिस्ती ननची हत्या केली होती. त्याची शिक्षा म्हणून त्याला उद्या मृत्युदंड देण्यात येणार आहे.