मृत्यू झालेले ते दोघेही कोरोना निगेटीव्ह

0

इतर 12 संशयित रुग्णांचेही अहवाल निगेटीव्हच

जळगाव– शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या दोन रूग्णांचा दोन दिवसापूर्वी मृृत्यू झाला होता.

या संशयितांच्या तपासणीचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. या दोघांसह उर्वरीत 12 संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे. या अहवालानंतर दिलासा मिळाला आहे.