मृत बैलांना टाकले नदीपात्रात : प्राणी मित्र संतप्त

पशूधनाच्या अवहेलनेने संताप : चिनावलकरांनी पुढाकार घेत मृत बैलांवर केला दफनविधी : सावदा पोलिसांची घटनास्थळी धाव

Dead bulls dumped in riverbed: Animal lovers Angry सावदा : येथून जवळच असलेल्या चिनावल नजीकच्या सुकी उटखेडा पुलाजवळील नदीपात्रात 22 बैल मृतावस्थेत आढळल्याने या परीसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुरांची अवैधरीत्या वाहतूक करताना त्यांचा मृत्यू ओढवल्याने नदीच्या प्रवाहात त्यांची विल्हेवाट लावण्यात असल्याची शक्यता असून पोलिस प्रशासनाने त्या दृष्टीने चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. सध्या सर्वत्र लंपी आजाराने थैमान घातले असतांना हा प्रकार घडल्याने पशू पालकांसह शेतकर्‍यांमध्ये भीती पसरली आहे.

घडल्या प्रकाराची चौकशीची मागणी
बुधवार, 14 रोजी रात्री चिनावल-उटखेडा रस्त्यावरील सुकी नदीपात्रात सुमारे 22 मयत बैल आढळले आहेत. या प्रकाराची पोलिस चौकशी व्हावी, अशी परीसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी मागणी केली आहे. चिनावल येथील शेतकरी व युवकांनी या मयत पशूधनावर जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून अंत्यसंस्कार केले. यावेळी श्रीकांत सरोदे, पोलिस पाटील निलेश नेमाडे, योगेश भंगाळे, बापू पाटील, विशाल बोरोले, निलेश गारसे, निखील गाजरे, हितेश भंगाळे, टेनू नेहते व शेतकर्‍यांची उपस्थिती होती.