मृत मुलाच्या कुटुंबाने धनादेश स्विकारण्यास दिला नकार

0

तलासरी : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ठक्कर बाप्पा विद्यालयातील ९ वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या नितेश भोये या विद्यार्थ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवार दि. २१ मार्च रोजी शाळे शेजारी आंब्याचा झाडाला आढळून आला होता. त्यानंतर मृतदेह स्वीकारण्यास नकार देत नातेवाईकांनी मुख्याध्यापक, अधीक्षक व शाळा संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी तहसीलदार, पोलीस, आमदार, शिक्षण विभाग, शाळा संचालक यांनी 30 मार्च रोजी याबाबत चौकशी करून निर्णय घेण्यात येईल व दोषींवर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

त्याप्रमाणे मृतमुलाचे नातेवाईक व तहसीलदार, पोलीस ,शाळा संचालक ,शिक्षण विभाग यांची तहसीलदार कार्यालयात बैठक झाली, या बैठकीत पीडित मुलाचे पालक व नातेवाईक यांनी संस्थे कडून मदतनिधी म्हणून देण्यात येणाऱ्या 75 हजाराचा धनादेश स्विकारण्यास नकार देत जो पर्यंत मुख्यध्यापक , संस्था संचालक आणि अधीक्षक यांच्यावर कारवाई करून हलगर्जी व दुर्लक्षपणाचा ठपका ठेवून मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा नोंदविण्यात यावा व याबाबत संपूर्ण चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली. यावेळी बैठकीत पालकांनी शाळेत व वसतिगृहातुन विद्यार्थी आवरा बाहेर जातात कसे असा प्रश्न उपस्थित करीत शाळेत तसेच वसतिगृहात नियमित बंधनकारक असलेल्या प्रार्थना व पिटी घेतल्या जात नसल्याचा बाबी पालकांनी समोर आल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी याबाबत कुठेही वाच्यता करू नये यआ करीत विद्यार्थ्यांना सक्त ताकीद देण्यात आल्याचे सांगितले. यापूर्वीही गळफास आत्महत्या करण्याचा प्रकार घडला होता मात्र शाळेच्या मुख्याध्यापक आणि व्यस्थापणाने प्रकरण आर्थिक देवाणघेवाणीतून दाबले असल्याचा आरोप पालकांनी केला असून सदर मुलाचा मृत्यू प्रकरणाची चौकशी न करता संबंधित शाळा संचालक व मुख्याध्यापक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर कसलीही कारवाई न करता पीडित कुटुंबाला संस्थेकडून काही तुटपुंजी रक्कमेची आमिष दाखवून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. मृतदेह आढळून आला त्यादिवशी पोलिसांना मुख्यध्यापक व शाळा संचालक, अधीक्षक यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे मात्र अजूनही पोलिसांनी गुन्हा नोंदविला नसल्याने पीडित कुटुंब व नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

चिंतामण साठे : मृतमुलाचा मामा
मागील आत्महत्येचा प्रयत्नातील घटनेत हि चौकशी झाली नाही शिवाय ह्या प्रकरणात आम्हाला आमिष दाखवून चौकशी न करताच मुख्यध्यापक ,अधीक्षक , शाळा संचालक यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून सखोल तपास व चौकशी करून कारवाई करण्यात यावी.

विशाल दौडकर : तहसीलदार
पीडित कुटुंबाला धनादेश देण्यात येत होता परंतु पीडित कुटुंब व नातेवाईकानी स्विकारण्यास नकार दिला , त्यांना याबाबत काय चौकशी होत आहे याची माहिती पोलीसांकडून मिळू शकेल.

शाळा संचालक प्रतिनिधी कडून दोषीकर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन देत वसतिगृह व शाळा बाबत असलेल्या त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न करणारचे आश्वासन देऊन ३० मार्च रोजी पालक व शाळा संचालक व्यवस्थापन तसेच अन्य पदाधिकारी यांच्या शी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे जाहीर केल्या नंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला .