नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी फास्ट फुट चेन असलेल्या मॅकडोनाल्ड कंपनीचे १६९ रेस्टॉरंट आउटलेट बंद होणार आहेत. त्यामुळे हजोरो लोकांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळणार आहे. स्थानिक भागीदारांसोबत नेहमीच होणाऱ्या मतभेदांमुळे हा निर्णय मॅकडोनाल्डने घेतला आहे. भारतात मॅकडोनाल्डचे एकूण ४३० आउटलेट आहेत.
भारतात दोन फ्रँचायजी कंपन्यांपैकी एक असलेल्या सीपीआरएल कंपनीने आउटलेट बंद करण्यासाठी आपल्याला परीस्थितीने भाग पाडले असे सांगताना काही स्थानिक भागीदारांनी नियम, अटींचा भंग केला असेही मॅकडोनाल्डने स्पष्ट केले. सीपीआरएलचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम बख्शी यांनी मॅकडोनाल्डचा निर्णय मोठा धक्का असल्याचे सांगितले. नॅशनल कंपनी लॉ ट्राईब्युनॉल (राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण)च्या आदेशाला आव्हान देणारा हा निर्णय असल्याचे बख्शी यांनी सांगितले. सीआरपीएल आणि मॅकडोनाल्डमध्ये अनेक वर्षे कायद्याची लढाई सुरू आहे.
मॅकडोनाल्डने उत्तर आणि पूर्व भारतात ६५०० लोकांना रोजगार दिला आहेच शिवाय अनेकांना अप्रत्यक्ष रोजगारही दिली आहे. भारतात १० हजार लोकांभोवती नोकऱ्या जाण्याचे संकट घोंघावत आहे.