मुंबई:महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उद्योग प्रकल्प असणारा मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन)चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला, यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार. उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते. विविध १२ देशांतील गुंतवणुकदारांसोबत १६ हजार ३० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट केले आहे, यावरूनच आता सरकारवर टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्र भाजपाने राज्य सरकारवर टीका केली आहे. सीएमओच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मागील बाजूला असलेल्या बॅनरवर महाराष्ट्राचा नकाशा उलटा दिसत असल्यावर भाजपाने, “याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह” असा टोला लगावला आहे.
“महाराष्ट्राचा नकाशा उलटा “करून दाखवला.” याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह! सगळं काही चौपट करून ठेवलं आहे आता नकाशा सुद्धा उलटा केला..” असं ट्विट महाराष्ट्र भाजपाने केले आहे.
महाराष्ट्राचा नकाशा उलटा “करून दाखवला.”
याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह!
सगळं काही चौपट करून ठेवलं आहे आता नकाशा सुद्धा उलटा केला.. https://t.co/81NYiXIrAr
अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत राज्य सरकारने करार केले. या कार्यक्रमाचे काही फोटो सीएमओच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आले आहेत. त्यापैकी एक फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे करार झालेल्या देशांचे झेंडे आणि मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0चा बॅनर दिसत आहे. या फोटोमध्ये लावण्यात आलेला महाराष्ट्राचा नकाशा असणारा बॅनर उलटा ठेवण्यात आला आहे. यावरुनच भाजापने ट्विटवरुन सरकारवर टीका केली आहे.
Magnetic Maharashtra 2.0 Roadmap launched by CM Uddhav Balasaheb Thackeray. 12 major MoU’s with Foreign Companies with investment worth more than ₹16,000 Crore to be signed today.
#MadeForBusiness https://t.co/g56LL0Y2IS
शिवसेनेच्या समर्थकांनी या ट्विटला रिप्लाय करुन व्हीडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये समोर बसलेल्या व्यक्तीला महाराष्ट्राचा नकाशा सरळ दिसावा म्हणून तो तशापद्धतीने वापरण्यात आल्याचा दावा केला आहे.
या फोटोवरुन आता भाजपा समर्थक आणि सरकार समर्थकांमध्ये वाद सुरु झाला आहे.