मुंबई । रविवारच्या भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यावर तब्बल 10 हजार कोटींचा सट्टा लागला असल्याची माहिती बुकींकडून उघड झाली होती. मुंबईत त्याची जोरदार चर्चा सुरू होती. आतापर्यंत झालेल्या सामन्यावेळी 4 ते 5 हजारांचा सट्टा लागला होता. या सामन्याचा भाव जरा जास्तच होता. हा सामना सुरू झाल्यानंतर मात्र तो हा आकडा चांगलाच वाढल्याचे बोलले जाते. सट्ट्याच्या बाजारात भारताचे पारडे जड असल्याचे सांगण्यात येत होते.
पाकिस्तान जिंकला तर रूपयाला 3 रूपये
बुकींकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामन्यात भारत जिंकला तर 1 रुपयाचा सट्टा लावणार्याला दीड रुपये मिळणार होते. तर पाकिस्तान जिंकला तर 1 रुपयाचा सट्टा लावणार्यास 3 रुपये मिळणार होते. तर या सामन्यात नाणेफेक भारताने जिंकल्यास 1 रुपयाचा सट्टा लावणार्याला 1 रुपये 72 पैसे मिळणार होते. तर पाकिस्ताननं टॉस जिंकल्यास 1 रुपयाचा सट्टा लावणार्याला 2 रुपये 33 पैसे मिळणार होते.
कोहली आणि अझर अलीवरही विशेष लक्ष
या शिवाय कर्णधार विराट कोहली आणि अझर अलीवरही सट्टेबाजांचे विशेष लक्ष आहे. उद्याच्या सामन्यात विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्यास 1 रुपयामागे 2 रुपये 33 पैसे मिळणार होते. तर अझर अलीने सर्वाधिक धावा केल्यास 3 रुपये 85 पैसे मिळणार अशी ऑफर देण्यात आली होती. यासोबतच रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्यास 1 रुपयामागे 3 रुपये 89 पैसे मिळणार होते. तर शोएब मलिकने सर्वाधिक धावा केल्यास 1 रुपयामागे 3 रुपये 93 पैसे मिळणार होते.