क्विन्सलँड्स : ऑस्ट्रेलियाचा नामांकित माजी गोलंदाज मॅथ्यू हेडन याचा अपघात झाला आहे. क्विन्सलँड्स येथील एका बीचवर मुलासह सर्फींग करताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे हा अपघात झाला. त्याच्या पाठीच्या कण्याला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. त्याच्या प्रकृतीत हळुहळु सुधारणा होत आहे.
हेडनचा असा अपघात होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2000 मध्ये मासेमारी करताना त्याची बोट बुडू लागली आणि त्याला काही किलोमीटर पोहावे लागले. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा अँड्य्रु सायमंडही होता. हेडनने 103 कसोटी, 161 वनडे आणि 9 ट्वेंटी-20 सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.