मॅथ्स स्पीड स्पर्धेचे आयोजन

0

तळेगाव दाभाडे :- येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय मॅथ्स स्पीड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 716 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर 87 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक मुख्याध्यापिका मीना अय्यर यांच्या हस्ते देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी व कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उदाहरणे त्यांना सोडवता यावी यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नर्सरी ते 9 वी पर्यंतच्या 716 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संस्थेचे अध्यक्ष संदिप चंद्रकांत काकडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सर्व संचालक मंडळ ,शाळेचे सर्व शिक्षकवृंद यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.