वरणगाव सेंट्रल बँकेच्या कारभाराविषयी संताप ; ग्राहक वरीष्ठ स्तरावर दाद मागणार
वरणगाव :- सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वरणगाव शाखेत दुपारच्या वेळेस बँक मॅनेजर नसल्याने ग्राहकांनी खुर्चीला निवेदन देत संताप व्यक्त केला. वरणगाव सेट्रल बँकेच्या भोंगळ कारभाराबाबत अनेक तक्रारी केल्यानंतरही दखल घेतली जात नाही. ग्राहकांना सन्मानाची वागणूक मिळत नाही, व्यवहाराबाबत योग्य ती माहिती दिली जात नाही तसेच कर्जाबाबत विचारणा केली असता हाकलून दिले जाते. बुधवारी तर बँकेने मनमानी कारभाराचा कळस गाठला. पासबुकाची नोंददेखील बंद असल्याचे सांगण्यात आले.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
याबाबत तक्रारीचे निवेदन घेण्यास अधिकारी नकार देत होते. बँकेचे मॅनेजर सुध्दा नसल्याने ग्राहकांनी तक्रारीचे निवेदन खूर्चीवर ठेवले. निवेदनावर विकास बोरसे, धोंडू गोविदा वाढे, झेंडू हौसू, प्रमोद कोलते, शरद हिवरे, ताराचंद राठोड, सागर वाणी, पदमीन दांडे, भागवत कोल्हे, चंद्रकात झोपे, अशोक भोईटे, अशोक गडारव, रमेश पाटील आदींच्या स्वाक्षरी आहेत.