मॅराडोना दुसर्‍यांदा भारत दौर्‍यावर; दादाशी भिडणार!

0

कोलकाता। अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना व भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान सौरव गांगुली या दोघांच्या टीममध्ये येथे चॅरिटी फुटबॉल सामना होणार असून दादा सौरव त्याचे बॅटप्रमाणेच फुटबॉलमधील कौशल्यही प्रेक्षकांना दाखविणार आहे. मॅरेडोना यांची ही दुसरी भारत भेट आहे. 2008 साली कोलकाता येथे आले होते त्यावेळी त्यांची एक झलक पाहण्यासाठी विमानतळावर झुंबड उडाली होती. या सिटी ऑफ जॉयमध्ये पुन्हा येण्यास तो खूपच उत्सुक आहे. या शहराच्या अनेक मधूर आठवणी माझ्याकडे आहेत, असे मॅरेडोना यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या हस्ते सन्मान
कोलकाता येथील प्रेक्षकांना क्रिकेटप्रमाणेच फुटबॉलचेही अतोनात प्रेम आहे. मॅराडोनाचे गतवेळी येथील प्रेक्षकांनी प्रचंड स्वागत केले होते व आताही त्याच्या स्वागतासाठी ते उत्सुक आहेत. प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वेळी मॅराडोनाला लाईफ टाईम अचीव्हमेंट अ‍ॅवॉर्डने गौरविणार आहेत. सौरव व मॅराडोना टीममधून अनेक नामवंत खेळाडू खेळणार असून त्यांची नांवे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. 10 वर्षांनंतर पश्चिम बंगालच्या दौ-यामुळे मॅरेडोना आनंदी असून ही सन्मानाची बाब आहे, कोलकातासोबत आठवणी जोडल्या असून तेथील चाहते आणि कोलकाता खास आहेत अशी प्रतिक्रिया मॅरेडोना यांनी दिल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.