नवापूर । मॅरेज सर्टिफिकेट बनवून देण्याची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी नवापूर तालुका प्रमुख गणेश वडनेरे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पुर्वी मॅरेज सर्टिफिकेट बनवून देण्याची जबाबदारी नगर पालिकेकडे होती. पण आता ते आमची जबाबदारी नाही. ती वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे आहे असे सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. वैद्यकीय अधिकार्यांकडे विचारणा केली असता ती आमची जबाबदारी नाही किंवा कोणताही आदेश आम्हाला प्राप्त नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आम्ही या विषयात संभ्रमात आहोत. हा चिलम तंबाखू ओ घर बाजु असा प्रकार नगर पालिका व वैद्यकीय अधिकारी या दोघ संस्थानी चालवला आहे.
त्यामुळे जनतेला असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरी सदरचा विषय तात्काळ मार्गी लावून सदरची जबाबदारी निश्चित करून जनतेस न्याय मिळावा निवेदन देतेवेळी नवापूर शिवसेना तालुका प्रमुख गणेश वडनेरे, शहर प्रमुख गोविंद मोरे, शहर उपप्रमुख अनिल वारूडे, दर्पण पाटील, नवापूर युवा सेना प्रमुख राहुल टिभे, गणेश पाटील, राकेश दुबे, अजय पंचोली आदि उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार बी एस पावरा यांना निवेदन देण्यात आले