भुसावळ:- भव्या अशा स्वरूपात शहरात झालेल्या मॅरेथॉन (रन भुसावळ रन) स्पर्धेसाठी सहकार्य करणार्या दात्यांचाही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यात भुसावळचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे, सिद्धीविनायक ग्रुपचे संचालक कुंदन ढाके या मुख्य प्रायोजकांसह साईजीवन सुपर शॉपचे संचालक व नगरसेवक पिंटू कोठारी, अष्टभूजा डेअरीचे नितीन धांडे, कजरी गारमेंटस्चे किरण महाजन, तनारीका विनय फालक, ताप्ती एज्युकेशनचे मोहन फालक, बियाणी ग्रुपचे मनोज बियाणी, विघ्नहर्ता पब्लिकेशनचे रवी निमाणी आदींचा सन्मान करण्यात आला. त्या शिवाय स्पर्धेसाठी अहोरात्र झटणार्या आयोजन समितीतील पदाधिकार्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रथमच आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर
अत्यंत काटेकोर नियोजनासह स्पर्धकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेत रन भुसावळ रन स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेसाठी धावपटूंनी कापलेले अंतराचे परफेक्ट टायमिंग कळण्यासाठी आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यासाठी पुण्यातील स्पोर्टस् जिल्हा प्रा.लि.कंपनीचे तीन तंत्रज्ञ आले होते. शहरात त्यासाठी सेन्सर लावण्यात आले होते. स्पर्धेचे संपूर्ण अंतर कापल्यानंतर स्पर्धक मूळ स्थळी आल्यानंतर त्याच्या भ्रमणध्वनीवर त्याने नेमके किती मिनिट व सेकंदात अंतर कापले याची माहिती मिळाल्याने स्पर्धेचा पारदर्शकता हा निकष महत्त्वाचा ठरल्याने धावपटूंनीही समाधान व्यक्त केले. तीन व पाच किलोमीटर अंतरासाठी मात्र पारंपरिक पद्धत्तीने क्रीडा शिक्षक रमण भोळे तसेच डॉ.उत्कर्ष पाटील, डॉ.प्रवीण फालक यांनी रेफरी म्हणून काम पाहिले तर व्हिडिओ कॅमेर्यासह ड्रोन कॅमेर्याची स्पर्धकांवर नजर राहिली.