नवी दिल्ली: आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुरुवातीच्या तांत्रिक अडचणींवर मात करीत पूजा घाटकरने येथील डॉ. कर्णिसिंग शुटिंग रेंजमध्ये शुक्रवारी सुरू झालेल्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताला दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकून ददिले. माजी आशियाई चॅम्पियन असलेल्या २८ वर्षांच्या पूजाने २२८.८ गुणांसह कांस्य जिंकले. चीनच्या मेंगयावो शी हिने २५२.१ गुणांसह सुवर्ण जिंकून नवा विश्वविक्रम नोंदविला. तिची सहकारी डोंलिजी हिने २४८.९ गुणांसह रौप्यपदक पटकविले. मागच्या वर्षी रिओ आॅलिम्पिकचा कोटा मिळविण्यात थोड्या फरकाने वंचित राहिलेल्या पूजाने सुरुवातीला तांत्रिक चुका केल्या पण लगेच सावरत पहिल्या फेरीत ती दुसºया स्थानावर राहिली. अंतिम फेरीत लिजीकडून कडवे आव्हान मिळाल्यानंतरही फायनलदरम्यान पूजाच्या बंदूकचे ब्लार्इंडर पडले. तरीही अखेरचे काही शॉट तिने डोळे बंद करीत मारले . त्याआधी पात्रता फेरीत पूजाला ४१८ आणि मेंगयावोला ४१८.६ तर लिजीला ४१७.७ गुण मिळाले होते.
पदकाचे श्रेय नारंगला – पूजा
कांस्य विजेती पूजा घाटकर हिने विश्वचषक स्पर्धेत जिंकलेल्या कांस्यपदकाचे श्रेय कोच आणि आॅलिम्पिक नेमबाज गगन नारंग याला दिले. नारंगने माझे करियर घडविण्यात मोलाची मदत केल्याचे पूजाने विजयानंतर सांगितले. पूजाची कामगिरी पाहण्यासाठी नारंग स्वत: प्रेक्षकांत उपस्थित होता. पूजा म्हणाली,‘मी योजना आखली नव्हती. पण गगनने मला मानसिक आणि तांत्रिक बळ दिले. काल त्याने मला जे मार्गदर्शन केले त्यानुसारच आज काम केल्याने मला यश लाभले आहे. यावेळी गगन म्हणाला,‘पूजाने प्रशिक्षणासाठी मला काहीसे ब्लॅकमेल केले होते. तिला पात्रता फेरीत यश यायचे पण फायनलमध्ये अपयशाचा सामना करावा लागायचा. त्यावर तोडगा काढला. डावपेच आखून लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरलो.’