दोन दिवस तीन गाड्यांना होणार विलंब
भुसावळ- मनमान ते नांदगाव दरम्यान इंजिनिअरींग व ओएचई ब्लॉकच्या कारणामुळे भुसावळ मुंबई (अप ५११५४) व मुबंई भुसावळ (डाऊन ५११५३) या पॅसेंजर गाडया ९ ते १६ ऑक्टोंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यासह तीन एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावणार आहेत.
मनमाड ते नांदगाव स्थानकादरम्यान ९ ते १० ऑक्टोबर दरम्यान इंजिनिअरींग ब्लॉक घेण्यात आला आहे. तर ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान मनमाड स्टेशन यार्ड रिमोल्डिंग कार्यासाठी ९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोंबर दरम्यान ५११५४ अप भुसावळ मुंबई पॅसेंजर तर १० ते १६ ऑक्टोबर दरम्यान ५११५३ मुंबई भुसावळ पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे. यानंतर ही गाडी नियमित वेळेत धावेल. यासह ओएचई ब्लॉकमुळे ९ आणि १० ऑक्टोबर रोजी विभागातून धावणाऱ्या तीन गाड्यांना उशिर होणार आहे. अप १५०१८ गोरखपूर–एलटीटी काशी एक्स्प्रेसला हिसवळ रेल्वे स्थानकावर दुपारी एक ते तीन दरम्यान दोन तास थांबवण्यात येईल. तसेच १२३३५ भागलपूर–एलटीटी सुपरफास्ट गाडीला नांदगाव रेल्वे स्थानकावर दुपारी दोन वाजून पाच मिनिट ते दुपारी तीन वाजेपर्यंत ५५ मिनिटे थांबवण्यात येणार आहे. १२५३३ अप लखनऊ–मुंबई पुष्पक एक्स्प्रेसला नांदगाव रेल्वे स्थानकावर दुपारी सव्वादोन ते तीन वाजेपर्यंत ४५ मिनिटे थांबा देण्यात येणार आहे. मनमाड ते नांदगाव सेक्शन दरम्यान सलग दोन दिवस या गाड्या थांबवण्यात येणार असून रेल्वे प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होणार आहे.