जिल्हा विधी सेवा प्राधीकरणतर्फे आयोजन
जळगाव : मानसिक रूग्णांची कशा पध्दतीने काळजी घ्यावी, या अनुषंगाने नवीन डॉक्टरांसाठी मेंटल हेल्थ केअर कायदा 2017 नुसार जिल्हा रुग्णालयात मंगळवारी जिल्हा विधी सेवा प्राधीकरण कार्यालयातर्फे एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर झाले. या शिबिरात गावपातळीवर काम करणार्या डॉक्टरांना या कायद्याची माहिती व्हावी, यासह मानसिक रुग्णाबाबतच्या विविध कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
टोल फ्री 104 वरुन जाणून घ्या माहिती
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच. ठोंबरे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक एन.एस. चव्हाण, विधी सेवा प्राधिकरणाचे अॅड. के.बी. वर्मा यांनी यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करतांना ठोंबरे यांनी गावपातळीवर जाऊन नवीन डॉक्टर मानसिक रूग्णांसाठी काम करणार आहेत. त्यांना मानसिक अधिनियम बाबत माहिती व्हावी तसेच मानसिक आरोग्य काळजी अधिनियम कशासाठी आला. त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या अधिनियमान्वये ज्या व्यक्तींचे मानसिक आरोग्य चांगले नाहीत त्यांच्या पुनर्वसनासंबंधी काय तरतुदी आहेत, हे यावेळी स्पष्ट करण्यात आले. एखाद्या व्यक्तीस हा आजार असल्यास व त्याची तपासणी केली असल्यास त्याचे नाव जाहीर करता येत नाही. तसेच आरोग्य टोल फ्रि क्रमांक 104 वर नातेवाईक संपर्क करून समुपदेशन वा माहिती घेऊ शकतात. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकड ेदेखील मानसिकरित्या विकलांग व्यक्तीला कायदेशीर मदत दिली जाते. अशा व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी संबंधीत विभागाशी संपर्क करून विधी सेवा प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जातात. रूग्णाला आत्महत्येपासून प्रवृत्त करणे हा या मागील उद्देश असल्याचे यावेळी ठोेंबरे यांनी सांगितले. आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी मानले.