सोनगीर । बुरझड गाव शिवारातील जंगलात मेंढ्या चारण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत कुर्हाड व काठ्यांचा सर्रासपणे वापर करण्यात आला. भटू बारसु ठेलारी (३०) रा.बुरझड या मेंढपाळाने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला. बुरझड गावशिवारातील जंगलात मेंढ्या चारण्याच्या वादातून लखा गुलबा ठेलारी याने कुर्हाडीने भटू ठेलारी यांच्यावर हल्ला केला त्यात ते जखमी झाले. तसेच दगडु लहानु ठेलारी रा.बुरझड याने काठीने मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दुसर्या गटातील लखा गुलबा ठेलारी यांनी दिलेल्या फिर्यादीत बुधा धेंडा ठेलारी याने लखा ठेलारी यास काठीने मारहाण केल्याचे सांगितले आहे. घटनेचा तपास सपोनि एस.डी.बांगर करीत आहेत.