म्हसळा : म्हसळा तालुक्यांतील मेंदडी येथील एका आदिवासी महिलेवर दोन इसमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून पोलिस तपास करीत आहेत. पीडित महिला 27जुलै रोजी रात्री दारुच्या नशेत पडली असता एक रिक्षावाला इसम त्याची रिक्षा घेऊन तिच्याजवळ आला आणि तुला घरी सोडतो म्हणुन सांगितले. पीडित महिलेला साक्षीदाराच्या मदतीने त्याने रिक्षात बसविले. तीला घरी सोडण्याच्या बहाण्याने ती नशेत असल्याचा फ़ायदा घेऊन रिक्षा निर्जन स्थळी घेऊन गेले. तिथे गेल्यावर इथे तुझी वस्ती असल्याचे सांगून पीडित महिलेला घेऊन ते खाली उतरले. पुढे मेंदडी येथील जंगलात एका पडिक घरात त्या महिलेला घेऊन गेले व तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. पीडित महिलेने म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस तपास करीत आहेत.