नवी दिल्ली : एका ४६ वर्षीय लेलँड फे नावाच्या अमेरिकेतल्या माणसाच्या मेंदुतून डॉक्टरांनी ९८ कर्करोगाच्या ९८ गाठी काढल्या आहेत. २०११ मध्ये कवटीवरील गुल्मांवर उपचार करताना डॉक्टरांना संशय आला होता.
रोग पसरू नये म्हणून त्याच्या कवटीचा भागही काढून टाकावा लागला होता. मानेतील लसिका नोडही काढावे लागला होता. फेला नंतर कळले की कर्करोग फुफुस, जठर आणि मेंदुतही पसरत आहे. त्याने किरणोत्सार उपचारही घेतले. फेच्या मेंदुतील ९८ गाठी काढण्यासाठी डॉक्टरांना सात तास लागले. ९७ गाठी किरणांद्वारे तर ९८ वी गाठ शस्त्रक्रियेने काढण्यात आली. फेला झालेला मेलानोमा हा अत्यंत घातक त्वचेचा कॅन्सर असून तो शऱीराच्या सर्व भागात पसरू शकतो.