मेक्सिकोच्या अध्यक्षपदी अॅन्ड्रेस ओब्राडोर

0

मेक्सिको – मेक्सिकोच्या अध्यक्षपदी तेथील डाव्या आघाडीचे उमेदवार अॅन्ड्रेस मॅन्यूल लोपेझ ओब्राडोर यांची निवड झाली आहे. खासगी संस्थाच्या निवडणूकपूर्व जाहीर झालेल्या सर्वेक्षणातही प्रथम क्रमांकाची पसंती लोपेझ ओब्राडोर यांना मिळाली होती.

मेक्सिको शहराचे माजी महापौर राहिलेले लोपेझ ओब्राडोर आणि त्यांचे समर्थक सन २००६ पासून अध्यक्षपदासाठी प्रयत्न करत होते. २००६ साली त्यांनी प्रथम अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. ओब्राडोर यांचा हा तिसरा प्रयत्न होता. ज्यात त्यांना यश मिळाले. स्थानिक वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार ओब्राडोर यांना ५३ ते ५३.८ टक्के मते मिळाली. दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे जोस अॅन्टिनिओ मीड यांनी पराभवाची चाहूल लागताच, लोपेझ ओब्राडोर यांचा विजय मान्य करत त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.