मुंबई । शेतकर्यांच्या कर्जमाफीबरोबरच तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही,यासाठी राज्य शासन प्रक्रिया उद्योगाला चालना देणार असून कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी शेतील उद्योगांशी जोडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोकाकोलाच्या मिनीटमेड पल्पी मोसंबी ज्यूसचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झाले.
बाजारभाव मिळण्यासाठी प्रयत्नशील
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकर्यांच्या फळांना उचित मूल्य मिळावे,यासाठी मेक इन इंडिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जैन इरिगेशन व कोकाकाला सोबत करार केला. आज मोसंबी ज्यूसचे अनावरण त्याचेच फलित असल्याचे मुख्यमंत्री म्हटले, फलोत्पादक शेतकर्यांना योग्य भाव व बाजारमूल्य मिळणे हे परिस्थितीवर आधारभूत असते. बेभरवशाच्या बाजारापासून सुटका हवी असेल तर शेती मालावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यातून फलोत्पादनाला बाजारभाव चांगल्या मूल्यात मिळेल. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे असून मोर्शी येथे 12 विविध फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात येत आहे. तसेच उत्तम फळे यावीत, यासाठी दर्जेदार रोपटी शेतकर्यांना पुरविण्यासाठी नर्सरीही उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मान्यवरांनी व्यक्त केले मत
अशोक जैन यांनी म्हणाले कि, शेतकर्यांना दर्जेदार फळे उत्पादन करता यावीत, यासाठी जैन इरिगेशनतर्फे उच्च तंत्रज्ञान विकसित करून रोपे तयार करण्यात येत आहे.रोपे तयार करण्यासाठी मोर्शी येथे नर्सरी प्रकल्प उभारण्यात येणार, या प्रकल्पातील रोपे विदर्भ, मराठवाड्यातील शेतकर्यांना देण्यात येणार आहेत.अनावरण करण्यात आलेल्या मोसंबी ज्यूसची निर्मिती ही विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील शेतकर्यांनी पिकविलेल्या मोसंबीपासून तयार करण्यात आले आहे. मेक इन इंडिया अंतर्गत कोकाकोलाने केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत हे उत्पादन तयार करण्यात आहे,असे अहमद यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे, कोकाकोलाचे अध्यक्ष टी. कृष्णकुमार, जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन,अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, बीईसी फूडचे व्यवस्थापकीय संचालक विनू जैन, फ्रुट सर्क्युलर इकॉनॉमीचे असीम पारेख, कोकाकोलाचे इश्तियाक अहमद, अर्पण बासू,वासन शुक्ल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात जळगाव,औरंगाबाद,जालना तसेच विदर्भातील मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.