मेगा भरती करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

0

रिक्त जागांची माहिती घेण्याचे काम सुरू

पुणे : जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गातील पदांची मेगा भरती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी विविध विभागांतील रिक्त जागांची माहिती घेणे, मराठा आरक्षणासह इतर आरक्षणांनुसार पदांची निश्‍चिती करून त्याचा अहवाल तयार करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सुरू आहे.

ऑनलाइन पद्धतीने ही भरती प्रक्रिया होणार आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये वर्ग-3 संवर्गाच्या अनेक जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषदेतील वर्ग-3 च्या कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया ऑनलाइन राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. राज्य शासनाच्या नियंत्रणात जिल्हा परिषदांची ही मेगा ऑनलाइन भरती प्रक्रिया प्रथमच होत आहे.

अहवाल शासनाला पाठविणार

सध्या विभागनिहाय रिक्त पदांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अद्याप अंतिम आकडेवारी जमा झालेली नाही. सर्व माहिती जमा करून त्याचा अहवाल शासनाला पाठवण्यात येणार आहे. महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन, जि.प.