फैजपूर- तापी नदीवर साकार होणार्या महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या मेगा रिचार्ज प्रकल्प अर्थात महाकाय पुनर्भरण योजनेचा हवाई सर्वेक्षण शुभारंभ सोमवारी सकाळी नऊ वाजता धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात झाला. खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे व हा प्रकल्प साकार करणार्या तापी विकास महामंडळाचे अधिकारी यांच्या हस्ते नारळ फोडुन व हेलिकॉप्टरवर लावलेल्या आधुनिक यंत्रसामुग्री ची पूजा करून शुभारंभ करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात तापी विकास महामंडळाचे माजी अभियंता व राज्य माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, संजय गांधी योजना अध्यक्ष विलास चौधरी .माहीती राज्य आयुक्त व्हि.डी.पाटील,अधिक्षक अभियंता आनंद मोरे, कार्यकारी अभियंता जी.एस.महाजन, कार्यकारी अभियंता धनंजय पाटील, सहाय्यक कार्यकारी मनोज ढोकचवळे, के.पी.पाटील, सेवानिवृत उपविभागीय अभियंता एम.के.महाजन, सेवा निवृत्त उपविभागीय अभियंता मनोज वाकचौरे, नितीन राणे, पप्पू चौधरी, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. दरम्यान या योजनेचा सोमवारी शुभारंभ झाला असलातरी ढगाळ वातावरणामुळे सर्वेक्षण रविवारी सकाळी 11 ढगाळ वातावरणामुळे सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली नव्हती.