मेगा रीचार्ज योजना जगातील सातवा अजूबा

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; लवकरच लागणार योजनेचे काम मार्गी

रावेर- मेगा रीचार्ज योजना ही जगातील सातवा अजूबा असून लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या महापुनर्भरण योजनेद्वारे रावेर, यावल, चोपडा भागासहित सुमारे चार लाख एकर जमीन ओलिताखाली येणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची शिवप्रसाद नगराच्या मैदानावर सभा झाली.

यांची होती उपस्थिती
सभेला जलसंपदामंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, रावेर लोकसभेच्या भाजपा उमेदवार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार चैनसुख संचेती, जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा परीषद सदस्या नंदा पाटील, पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, सुनील पाटील, योगीराज पाटील, श्रीकांत महाजन आदींची उपस्थिती होती.