चोपडा । तालुक्यातील मोजे हिगोंणा येथील चार बालके अंगणवाडीतून दुपारी घरी येत असताना रस्त्यावर फेकलेले मेटाडाँन नावाचे विषारी पावडर त्यांनी कुतूहलाने तोंडात घेतल्यानंतर अस्वस्थ वाटु लागल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना जळगाव येथे पाठवत असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी नातेवाईकांना सांगितले मात्र, या बालकांना नातेवाईकांनी शहरातील खाजगी हाँस्पीटलमध्ये दाखल केल्याचे सांगण्यात आले.
बालसुलभ कुतूहल बेतले जीवावर: कृषि खात्यामार्फत फवारणीसाठी औषधी वाटप केले जाते. काही शेतकर्यांनी मेटाडाँन पावडरचेे खोके फेकून दिलेले आहेत. आज सकाळी अंगणवाडीतून स्नेहा शरद पाटील (4), आदित्य शरद पाटील (6), जित योगेश पाटील (अडीच वर्षे ), कल्याणी गुणवंत पाटील (4) यांना हे खोके दिसल्यावर त्यांनी बालसुलभ अनवधानानेपावडर चाखल्याचे गावातील तरुणांना दिसलेे त्या तरुणांनी खोके हिसकावल्याने अनर्थ टळला नंतर पालकांनी त्यानां उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते परंतु त्यांना जळगाव येथे पाठवावे लागेल असे डाँ. नरेंद्र पाटील यांनी सांगितले नंतर पालकांनी या बालकांना शहरातील मालती हाँस्पीटल मध्ये भरती केले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डाँ. आनंद पाटील यांनी सांगितले.