मुंबई : शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांच्यासाठी राज्यसरकार 20 लाखाची कार खरेदी करणार आहे. सरकारवर 4.33 लाख कोटींचे कर्ज असताना राज्यसरकारने एवढी महागडी कार खरेदी करण्याची तयारी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार खरेदीसाठी ऑर्डर काढली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या कार खरेदीच्या निर्णयाला विरोध केला होता. शिवस्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षांसाठी कार खरेदी करण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी हा विरोध दर्शविला होता. मात्र त्यांचा विरोध डावलून कार खरेदीची ऑर्डर काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.