मेट्रोचा विस्तार वाघोलीपर्यंत करा

0

ग्रामपंचायतीचे मेट्रो कॉर्पोरेशनला पत्र

वाघोली : सध्या रामवाडीपर्यंत सुरू असलेला पुणे मेट्रो प्रकल्प पुढे वाघोलीपर्यंत वाढविण्याच्या मागणीचे पत्र वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना पत्र देण्यात आले आहे.

पुणे महापालिकेलगतचे अतिशय वेगाने नागरीकरण होत असलेल्या वाघोलीची लोकसंख्या 1 लाख 20 हजारांच्या वर असून 24 हजार कुटुंबे याठिकाणी वास्तव्यास आहेत. बहुसंख्य रहिवाशांचे पुणे शहरात जाणे-येणे असते. पुणे मेट्रो रेल प्रकल्प रामवाडी पर्यंत सुरु असून वाघोली पर्यंत मेट्रो आल्यास चंदननगर, खराडी, लोहगाव व वाघोली परिसरातील 4 लाख लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे. वाघोली पर्यंत मेट्रो वाढवावी अशी मागणी सरपंच वसुंधरा उबाळे यांनी पत्राद्वारे केली आहे. मेट्रो महत्वाची आहे मात्र त्यापूर्वी महामार्गाचे रुंदीकरण आणि डीपी रोड याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत माजी उपसरपंच संदीप सातव यांनी व्यक्त केले.