मेट्रोचे काम सुरु असतांना नागरिकांची गैरसोय नको

0

पुणे-पुणे मेट्रोचा पहिला टप्पा सुरु झाला असून पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी असा मेट्रोमार्ग असणार आहे. या दोन्ही मार्गांचे काम सुरू असताना तसेच काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोतून प्रवास करताना नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाही, याबाबत महामेट्रो सातत्याने सजग आहे. काम सुरू असताना त्याबाबत नागरिकांना अडथळा येणार नाही आणि पूर्ण झाल्यानंतर मेट्रो प्रवास सुरक्षित होईल. तसेच सध्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेचा नागरिकांना जो मनस्ताप सहन करावा लागत आहे, तो मेट्रोच्या येण्याने होणार नाही, असे मत पुणे मेट्रोचे सल्लागार शशिकांत लिमये, मेट्रो कमिटी सदस्य रमेश राव यांनी व्यक्त केले.

पुणे मेट्रोबाबत माहिती देण्यासाठी चिंचवड येथील विलो मॅथर प्लॉट कंपनीत पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) आणि कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने मेट्रोसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी एसकेएफ, थिसन कृप, सीआयआय, आयटीआय, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट, विलो कंपनीतील अधिकारी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना लिमये आणि राव बोलत होते.