मेट्रोचे काम 30 टक्के पूर्ण

0
पिंपरी-चिंचवड : वाढणारी वाहनांची संख्या, त्यामुळे होणारे प्रदूषण आणि प्रवासासाठी लागणार वेळ या सर्वांना पर्याय म्हणून मेट्रोकडे पाहिले जात आहे. मेट्रोच्या वतीने शहरात मार्गिका क्रमांक एकचे काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये पिंपरी-चिंचवड करांना मेट्रोतून सुरक्षित आणि जलद प्रवास करता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे 30 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुरु असलेले महा मेट्रोचे काम आता आकर्षणाचा विषय झाला आहे. या कामाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो पिलरचे फाउंडेशन पासून ते मेट्रो स्थानकांपर्यंत सर्व पातळीवरील कामे जोरात सुरु आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका ते रेंज हिल हा 11.54 किलोमीटरचा मार्ग आहे. या मार्गावर एकूण नऊ मेट्रो स्टेशन आहेत.