चिंचवड- येथील मेट्रोपॉलिटन या ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने परिसरातील 10वी व 12वीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. सत्कार समारंभाचे शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ. राजेंद्र कांकरीया, आर.टी.ओ.च्या मोटार वाहन निरीक्षक शितल पवार, ब प्रभाग अध्यक्ष स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, ज्यˆˆेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रा. डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा फोल्डर फाईल, कॅल्क्युरेटर, वही, मार्गदर्शन करणारे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. प्रास्तविक कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन खुशाल दुसाणे यांनी तर सचिव शरद लुणावत यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला प्रकाश जैन, मदन प्रसाद, बांकेलाल शर्मा, श्रीकांत आंबेकर, संभाजी वाळके, प्रदीप पवार, कांतीलाल भंडारी, रविंद्र शेट्ये, अशोक कर्नावट, डॉ. प्रताप कोठारी, हेमंत फंड, बबन बुरडे, आनंद आफळे, मोहन खांडेकर, रवी राठोड, व्हिक्टर डिसुजा, अशोक नहार, वेणुगोपाल नायर, जयंत क्षेत्रमाडे, सुभाष गरड, दत्तात्रय सोनवणे, पाटील, नरहरी भागवत, बाळ भावसार, बापू जगताप, बाळकृष्ण घुले आदी उपस्थित होते.