मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार – शशिकांत लिमये

0

पिंपरी-चिंचवड :- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतुकीच्या विविध पर्यायांना समाविष्ट करत मेट्रोची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये पुणे मेट्रोच्या फेज 1 चे काम वेगात सुरू आहे. पुणे मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर या दोन्ही शहरांमधील सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार असल्याचे मत पुणे मेट्रोचे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे ‘मेट्रो संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

मेट्रोमुळे खाजगी वाहतूकीला मोठ्या प्रमाणात प्राध्यान्य
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक सध्या खाजगी वाहतूक सेवेला मोठ्या प्रमाणात प्राधान्य असल्याने रस्त्यावरील वाहनांच्या संख्यामध्ये वाढ होत चालली आहे. वर्तमान स्थितीत केवळ 15 टक्के नागरिक सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करीत आहेत. हा वापर मेट्रोमुळे 80 टक्क्यांवर जाईल. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर केल्यास नागरिकांना वेळेत इच्छित स्थळी पोहोचता येईल. वाहनांची गर्दी कमी झाल्यास पर्यावरणीय समस्या कमी होईल, असे शशिकांत लिमये म्हणाले,

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, प्रथम महिला मुग्धा कुलकर्णी, सचिव प्रवीण घाणेगावकर, माजी अध्यक्ष हिरा पंजाबी, अनिल कुलकर्णी, अरविंद खांडकर, ईश्वर ठाकूर, राणू सिंघानिया, शुभांगी कोठारी, रो. नरेंद्र मेहेर, सुभाष जयसिंघानी, मेट्रो कमिटी सदस्य रमेश राव, मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बि-हाडे आदी उपस्थित होते.

जगमोहन सिंग यांनी प्रास्ताविक केले. माजी अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी आभार मानले.