कामाला गतीही आणि विरोधही : खोदाईसाठी विदेशातून मशीन आणणार
पुणे : शहरामध्ये मेट्रो रेलची दोन मार्गांची कामे चालू असून त्याला गती मिळाली आहे आणि दुसरीकडे दोन ठिकाणी विरोधही होत आहे. महामेट्रोच्या प्रशासनापेक्षा राजकीय तोडगा निघणे आवश्यक आहे. पिंपरी ते स्वारगेट मार्गावर शिवाजीनगर ते स्वारगेट असा भुयारी मार्ग आहे. सुमारे पाच किलोमीटर मार्गाचे खोदाईचे काम सहा महिन्यात सुरू होईल. याकरीता विदेशातून टनेल बोअर मशीन आणले जाणार आहे. स्वारगेट आणि शिवाजीनगर गोदाम अशा दोन्ही बाजूने हे काम एकाच वेळी केले जाईल. पाच किलोमीटर अंतरात पाच मेट्रो स्टेशन्स होतील.
राजकीय मंजुरी आवश्यक
मार्गात बदल करणे, मेट्रो भुयारी करणे याकरिता राजकीय मंजुरी आवश्यक ठरणारी आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे नेते कोणता मार्ग निवडतात याकडे लक्ष राहील. मेट्रोचा वनाज ते रामवाडी असा दुसरा मार्ग. याही मार्गाचे काम वेगाने चालले आहे. येथे नगर रस्त्यावरील मार्गात बदल केल्याचा आरोप असून काँग्रेस अशा बदलाच्या विरोधात आहे. याखेरीज पुण्यातील पर्यावरणवादी विरोधात आहे.
धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न
कसबा पेठ स्टेशनसाठी काहींना विस्थापित व्हावे लागणार आहे. जागेचा मोबदला आणि स्थलांतर यावर विस्थापित समाधानी नाहीत आणि या कारणाने मेट्रो स्टेशन नको, असा मुद्दा घेऊन विरोधात उतरले आहेत. शिवसेना आणि मनसेचे प्रतिनिधी या विरोधात सामील आहेत. यात धार्मिक रंगही दिल्याने विरोधाला भावनिक जोड मिळाली आहे. शिवाय जुन्या वाड्यांमधील रहिवाशांना मेट्रोच्या अजस्त्र कामाने वाडे पडतील, अशी भिती वाटते आहे. हा विरोध संपला तर मेट्रोचा मार्ग मोकळा होणार आहे. मेट्रोच्या कामामुळे वाडे, इमारती यांना धोका पोहोचणार नाही, याचा विश्वास प्रशासन देऊ शकते. परंतु विरोधात उभे राहिलेले धार्मिक, भावनिक संदर्भावर राजकीय तोडगा काढावा लागेल.
भाजप, सेनेच्या भूमिकेकडे लक्ष
येरवडा येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यातील पक्षी जीवनाला धोका पोहोचेल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. येथे मेट्रोच्या बदलाला विरोध जसा आहे तसा नगर रस्त्यावर भुयारी मेट्रो मार्ग करावा, असा पर्यायही मेट्रोच्या मार्ग बदलाला विरोध करणार्यांनी दिला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी राजकीय तोडगाच अंतिम ठरणार आहे. मार्गात बदल करणे, मेट्रो भुयारी करणे याकरिता राजकीय मंजुरी आवश्यक ठरणारी आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे नेते कोणता मार्ग निवडतात याकडे लक्ष राहील.
मार्गातील बदलाला काँग्रेसचा विरोध
मेट्रोचा वनाज ते रामवाडी असा दुसरा मार्ग. याही मार्गाचे काम वेगाने चालले आहे. येथे नगर रस्त्यावरील मार्गात बदल केल्याचा आरोप असून काँग्रेस अशा बदलाच्या विरोधात आहे. याखेरीज पुण्यातील पर्यावरणवादी विरोधात आहे. येरवडा येथील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यातील पक्षीजीवनाला धोका पोहोचेल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. येथे मेट्रोच्या बदलाला विरोध जसा आहे तसा नगर रस्त्यावर भुयारी मेट्रो मार्ग करावा, असा पर्यायही मेट्रोच्या मार्ग बदलाला विरोध करणार्यांनी दिला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी राजकीय तोडगाच अंतिम ठरणार आहे.