पुणे । पुण्यातील बहुचर्चित शिवसृष्टी साकारण्याचा मार्ग मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सुकर केला. चांदणी चौकाजवळील जैववैविध्य आरक्षण उद्यानाच्या (बीडीपी) जागेत तब्बल 50 एकर जागेत शिवसृष्टी होणार आहे. त्यासाठी पुरेसा निधी देण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे 11 फेब्रुवारीपासून मेट्रोचे काम बंद पाडण्याचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी केली.
पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह महापालिकेतील सर्व राजकीय पक्षांचे गटनेते या बैठकीत उपस्थित होते. ‘सह्याद्री’वर सुमारे दीड वाजता सुरू झालेली बैठक दोन-सव्वादोनच्या सुमारास यशस्वीरित्या पार पडली.
वनाज-रामवाडी मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावर जुन्या कचरा डेपोच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा ठराव महापालिकेन यापूर्वी केला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावाही सुरू आहे. मात्र, मेट्रो मार्गावर या जागेवर मेट्रोचा डेपो उभारायचा असल्याचे महामेट्रोने म्हटले होते. शिवसृष्टी आणि त्या खाली मेट्रोचा डेपो उभारावा, असाही पर्याय आला होता. मात्र, शिवसृष्टी आणि मेट्रोचा डेपो हे दोन्ही एकाच ठिकाणी उभारणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर बैठकीच्या अगोदरच चांदणी चौकातील बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मान्य करावा, यासाठी मोर्चेबांधणी झाली आणि बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शिवसृष्टीसाठी लागणारी बीडीपीमधील जागा महापालिका संपादित करणार आहे. त्यासाठी मोबदल्याचे धोरण राज्य सरकार लवकरच जाहीर करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेच्या मागणीनुसार स्वारगेट ते कात्रज मार्गाचे तर पिंपरी चिंचवड पालिकेच्या मागणीनुसार चिंचवड ते निगडी मार्गाचा डीपीआर बनवण्याचे काम मेट्रोने हाती घेतले असून ते 4 महिन्यात पूर्ण होणार असल्याचे ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. मेट्रोला आवश्यक असणार्या सर्व परवागी आणि जागांची उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पुढील कालावधीत पुणे मेट्रोच्या कामाला वेग मिळणार असून प्रत्येक मार्गावर प्रति महिना 25 पिलर उभरण्याचे उद्दिष्ट्य महामेट्रोने ठेवले असल्याची माहित महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.
प्रतिमहिना 25 पिलर
आज कोथरूड डेपोच्या जागेवर शिवसृष्टी का मेट्रो स्टेशन या बाबतचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती मध्ये मुंबई येथे घेण्यात आला यामध्ये कोथरूड येथे मेट्रो स्टेशन होणार यांवर शिकामोर्तब करण्यात आले आहे. त्या पार्श्ववभूमीवर महामेट्रीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांनी पत्रकार परिषदचे आयोजन केले होते. यावेळी दीक्षित म्हणाले कि कोथरूड येथेल 28 एकर जागा मेट्रो स्टेशनला देण्याबाबत आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाच्या कामाला वेग मिळणार आहे. तसेच मेट्रोला आवश्यक असणार्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत सर्वाचं मार्गिकांवरचे काम वेगाने होणार असून प्रत्येक मार्गिकेवर प्रतिमहिना 25 पिलर उभारण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने समोर ठेवले असल्याचे ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. तसेच पुणे महापालिकेच्या मागणी नुसार स्वारगेट ते कात्रज मार्गाचे तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागणीनुसार चिंचवड ते निगडी मर्गाचा डीपीआर बनवण्याचे काम हाती घेण्यात आले असून पुढील 4 महिन्यात ते पूर्ण होणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.