मुंबई । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईचा श्वास असलेला आरे भाग हा त्यांनी विकायला काढलेला आहे. मुंबईतील प्रमुख बिल्डरांना हाताशी घेऊन जबरदस्तीने व जिद्दीने या आरे भागात मेट्रो यार्ड तयार करत आहेत. मुंबईत या मेट्रो यार्डसाठी कांजुरमार्ग, महालक्ष्मी रेसकोर्स, कुलाबा, कालिना येथील मुंबई विद्यापीठ येथे जागा उपलब्ध असताना ही मुख्यमंत्री मुद्दामून बिल्डरांच्या भल्यासाठी आरे येथे मेट्रो यार्ड तयार करण्याचा घाट घालत आहेत. हा संपूर्ण 18000 करोडचा घोटाळा आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. मुंबईतील प्रमुख वर्तमानपत्रात भाजप सरकारने मेट्रो आरे यार्ड संदर्भात जाहिरात दिली आहे, त्यावर निरुपम यांनी आरे बचाव समितींच्या कार्यकर्त्यांसहित पत्रकार परिषद घेतली.
संपूर्ण भारतात जिथे जिथे मेट्रो यार्ड झाले तिथे मेट्रो यार्डसाठी 18 हेक्टर जागा पुरेशी असते परंतु हे सरकार या मुंबईतील या मेट्रो यार्डसाठी 30 हेक्टर जमीन प्रस्तावीत करत आहेत म्हणजेच 12 हेक्टर आरेतील जमीन हि बिल्डरांच्या घशात घालून तिथे व्यावसायिक वापरासाठी हि जमीन उपलब्ध करणार आहेत. हा खूप मोठा घोटाळा आहे असा आरोप त्यांनी केला.