मेट्रो सिनेमाला नोटीस

0

जळगाव । टुरिस्ट कॉम्प्लेक्समधील मेट्रो सिनेमा थिएटरचा परवाना पाच वर्षांपासून नूतनीकरण न करता चित्रपट दाखवत असल्याबद्दल जिल्हा दंडाधिकार्‍यांनी संचालकांना नोटीस बजावली आहे. सात दिवसात याबाबत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेशात म्हटले. जिल्हादंडाधिकारी यांनी ऑगस्टला मेट्रो सिनेमाचे नऊ संचालकांना ही नोटीस बजावली आहे. यात सिनेमा परवाना क्रमांक 1/2008 चे नमुना ई-करीता सादर केलेले प्रतिज्ञापत्राबाबत दिवसाच्या आत लेखी खुलासा सादर करण्याबाबत सांगण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मालमत्ता आपणास आपणास 30 वर्षांच्या भाडेतत्वावर चालविण्यास दिली आहे. महामंडळाने मंजूर करून दिलेल्या पार्टनरशिप डीड प्रमाणे पार्टनरशिप डीड केले नसल्याचे तसेच महामंडळास भाडेपट्टा अदा केल्याने विधीवत कार्यवाही सुरु आहे. मेट्रो सिनेमा या नावाने ओम असोसिएटस या फर्मने सिनेमा दाखविण्यासाठी नमुना (नियम 101 नुसार प्रतिज्ञापत्र रद्द करणे कामी दिलेल्या अर्जाबाबतचा खुलासा सादर करावा असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.