मेट्रो-3 प्रकल्पामुळे वांद्रे-सिप्झ मार्गावरील सततची वाहतूककोंडी सुटणार कायमची

0

मुंबई । जपान आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेशन एजन्सी अर्थात जायकाकडून कुलाबा-वांदे्र-सिप्झ या तिसर्‍या संपूर्णत: भुयारी मेट्रो मार्गासाठी 6 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले असून, त्याबाबतच्या करारावर नुकत्याच स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. दिल्ली येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात केंद्र सरकार आणि जायका प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईतील मेट्रो मार्गिकेच्या वाहतूककोंडीवर उपाय काढता यावा, यासाठी अंशत: कर्ज घेण्यात आले आहे. ऑफिशिअल डेव्हलपमेंट असिस्टन्स अर्थात ओडीए कर्ज म्हणून 6000 कोटी रुपये कर्ज घेण्यात आले आहे. या कर्जासाठी 1.5 टक्के व्याजदर व अटी शर्ती सेवांसाठी 0.01 टक्के व्याज दर व कर्ज परताव्यासाठी 30 वर्षांची मुदत देण्यात आली आहे. या कर्जामुळे कुलाबा-वांद्रे-सिप्झ या तिसर्‍या भुयारी मेट्रो मार्गादरम्यान परिवहन प्रणालीचा विकास होण्यास मदत होणार असून प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

60 हजार कोटींची गुंतवणूक
जायका इंडिया कार्यालयाचे मुख्य प्रतिनिधी टोकामा सकमोटो यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील वाढत्या परिवहन गरजांची पूर्तता या कर्जामुळे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे, तर वायुप्रदूषण कमी होऊन अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ या तिसर्‍या भुयारी मार्गाची लांबी 33.51 किमी असून वांद्रे-कुर्ला संकुल, विमानतळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास, सिप्झ, जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड या विभागातून जाणार असल्याने प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे. जायकाच्या माध्यमातून भारतात दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, मुंबई आणि अहमदाबाद येथील मेट्रो मार्गिकेसाठी जवळपास 60 हजार कोटी रुपये कर्जाची गुंतवणूक केली आहे..