मेधा पाटकरांच्या अटकेबद्दल निषेध

0

जळगाव । मध्यप्रदेश सरकारने मेधा पाटकरांसह आंदोलनकर्त्यांवर हजारोंच्या संख्येने पोलिस बळाचा वापर करीत अमानुष लाठीहल्ला केला व उपोषणकर्त्या महिला साथींना जबरदस्ती लाथाबुक्क्यांनी मारत पोलिसव्हॅनमध्ये कोंबले. मध्यप्रदेश शासनाच्या या हिटलरशाही कृत्याचा व लोकशाहीला पायमल्ली तुडवण्याच्या कृत्याचा जिल्ह्यातील लोकसंघर्ष मोर्चा, बहुजन क्रांतीमोर्चा, शिवराय क्रांतीमंच, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्तीमोर्चा, राष्ट्रसेवा दल इत्यादी संघटनांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन निषेध नोंदविला आहे.

सुटकेची केली मागणी
मेधा पाटकर यांच्या आंदोलनास देशभरातून व जगभरातून पाठिंबा वाढत असल्याने केंद्र सरकार, मध्यप्रदेश सरकार व गुजरात सरकारने हे आंदोलन पुनर्वास न करता चिरडण्याचा जोपर्यंत चालवला आहे तो तात्काळ थांबवावा व नर्मदा बचाओ आंदोलनाशी सकारात्मक चर्चा सुरु करावी. अन्यथा नर्मदेच्या लढ्यात आम्हीही सक्रिय सहभाग नोंदवू असे निवेदनात म्हटले असून मेधा पाटकरांची तात्काळ सुटकेचीही मागणी यात केली आहे. यावेळी शंभु पाटील, प्रतिभा शिंदे, मुकूंद सपकाळे, फईम शेख, प्रकाश बारेला, संजीव कांडेलकर, भानुदास गायकवाड उपस्थित होते.