मेमू गाडीतून प्रवाशाचा मोबाईल चोरीला

भुसावळ : रेल्वे प्रवासात चोर्‍या वाढलसा असून बडनेरा मेमूत प्रवेश करताना 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेल्याने या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नांदुरा रेल्वे स्थानकावर निखील प्रदीप कोल्हे हे गाडीत चढत असताना मंगळवारी सायंकाळी 5.15 वाजता चोरट्याने मोबाईल लांबवला. कोल्हे हे नांदुरा रेल्वे स्थानकावरून बडनेरा-भुसावळ या मेमू गाडीत चढत असतांना त्यांच्या खिश्यातून मोबाईल लांबवण्यात आला. भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो नांदुरा लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला.